Village Business Ideas in Marathi : गावातून सुरू करा हे व्यवसाय, रोज कमवा 3000 रुपये ! वाचा शंभर टक्के फायद्याची खरी माहिती

मित्रांना शेअर करा:

Village Business Ideas in Marathi  :- नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये आपण 25+ Village Business Ideas in Marathi बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. गावामध्ये राहून तुम्ही हे व्यवसाय सुरू करू शकता, सोबतच तुम्ही या व्यवसायाद्वारे दिवसाला ₹3000 रुपये कमावू शकता.

25+ Village Business Ideas in Marathi (गावातून करता येणारे 25+ व्यवसाय)

मित्रांनो तुम्हाला जर गावामध्ये एखादे व्यवसाय सुरू करायचा असेल, तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिस्ट मधून कोणत्याही स्वरूपाचा व्यवसाय निवडू शकता. यामध्ये आम्ही वेगवेगळे Village Business Ideas दिल्या आहेत. ज्याद्वारे तुम्ही भरमसाट पैसे कमवू शकता.

1 मशरूम शेती

गावामध्ये जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही मशरूम शेतीकडे वळू शकता. कारण या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा आहे. सोबतच ही एक नवीन कल्पना असून, गावांमध्ये मशरूम शेती चांगल्या प्रकारे चालू शकते. मशरूम शेतीसाठी तुम्ही गावामध्ये त्याची लागवड करू शकता आणि जवळपासच्या शहरांमध्ये त्याची विक्री देखील करू शकता.

2 स्वदेशी उत्पादनांचे विक्रेते

गावामध्ये व्यवसाय करण्यासाठी तुम्ही स्वदेशी उत्पादनाचे विक्रेते होऊ शकता, देशामधील निर्माण झालेले उत्पादने वस्तू यांची विक्री तुम्ही याद्वारे करू शकता. हा एक नाविन्यपूर्ण व्यवसाय असून, गावामध्ये तुम्ही स्वदेशी वस्तूंची विक्री करून मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकता.

शहरात जसे स्वदेशी वस्तूंचे वेगवेगळे दुकाने असतात त्याचप्रमाणे तुम्ही दुकान काढून, स्वदेशी कंपन्यांच्या वस्तू तेथे ठेवू शकता. जसे की पतंजली.

3 फळे आणि भाजीपाला शेती

शेती मधील एक सर्वात पैसे देणार व्यवसाय म्हणजे फळे आणि भाजीपाला शेती. पारंपारिक रित्या शेती करण्यापेक्षा तुम्ही गावामध्ये फळे आणि भाजीपाला शेती करणे सुरू केले, तर त्याद्वारे मी मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकता.

फळे आणि भाजीपाला शेतीमध्ये तुम्ही अगदी एका महिन्यामध्ये पीक घेऊ शकता, त्यानंतर लगेच दुसरे पीक देखील त्यामध्ये घेऊ शकता. यामुळे शेतीमध्ये केवळ एक पीक न घेता, तुम्ही वर्षांमध्ये बरसे पीक घेऊन भाजीपाला आणि फळे यांचा व्यवसाय करू शकता.

4 होममेड कंपोस्टिंग

गावामध्ये व्यवसाय करण्यासाठी तुम्ही होममेड कंपोस्टिंग याची निवड करू शकता. घरगुती शेणखत ओला कचरा इत्यादींचा वापर करून तुम्ही खताची निर्मिती करू शकता. आणि ते खत तुम्ही शेतकऱ्यांना शेतीसाठी विकू शकता, ज्यामुळे तुम्हाला गावातल्या गावात व्यवसाय करता येईल आणि शेतकऱ्यांना देखील चांगल्या प्रतीचे खत मिळेल.

5 पशुखाद्य उत्पादने

जनावरांच्या निगडित अनेक स्वरूपाची व्यवसाय आहेत, त्यामध्ये पशुखाद्य हे प्रमुख व्यवसाय आहे. गावामध्ये बऱ्याच प्रमाणात लोक गाई म्हशी यांचे पालन करतात. त्यांना पशुखाद्याची गरज पडत असते. यावरूनच तुम्ही पशुखाद्य उत्पादनाचा व्यवसाय सुरू करू शकता, ज्यामध्ये तुम्ही गाई म्हशी साठी पेंड, सरकी पेंड, शेंगदाणा पेंड इत्यादी पशुखाद्य उत्पादनांची विक्री करू शकता.

6 मेटल रॉड बनवणे

मेटल रॉड बनविणे हा एक व्यवसाय जरा जठील आहे, परंतु गावामध्ये तुम्ही लोहार यांच्या मदतीने मेटल रॉड बनवण्याचे व्यवसाय सुरू करू शकता. मेटल रॉड ची मागणी ही खूप असते, यामध्ये तुम्ही गजाळी देखील बनवू शकता. बांधकामासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, यामध्ये तुम्ही स्वतः गजळी किंवा मेटल रॉड बनवण्याची गरज नाही. तुमच्याकडे जर साधने असतील तर तुम्ही बनवू देखील शकता, किंवा थेट तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांची डीलरशिप घेऊन हा व्यवसाय करू शकता.

7 बांधकाम व्यवसाय

या व्यवसायामध्ये तुम्ही घर बांधू शकता आणि मोठ्या प्रमाणात नफा कमवू शकता, बांधकाम व्यवसाय हा असा व्यवसाय आहे जो समाजाच्या गरजेचा आहे. यात रस्ते, अपार्टमेंट्स आणि घरे बांधण्यापासून ते लहान प्रकारच्या आणि जटिल फिटिंग्ज आणि विविध प्रकारच्या बांधकामांमध्ये वापरल्या जाणार्‍या फिक्स्चरच्या इमारतींपासून ते व्यापत आहेत.

8 लाकडी उत्पादने

लाकडी उत्पादने व्यवसाय हा सर्वाधिक चालणारा व्यवसाय आहे, गावामध्ये तुम्ही जर हा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा मिळू शकतो. कारण गावांमध्ये पारंपरिक स्वरूपात सुतार असतात, परंतु आता त्यांना नाविन्यता सुरुवात लाकडी उत्पादने निर्माण करणे जमत नाही. तेव्हा तुम्ही त्यांना काम देऊन नवे लाकडी उत्पादने कसे बनवायचे ते शिकवून, किंवा स्वतः वेगवेगळ्या मशीन द्वारे लाकडी उत्पादने बनवून त्यांची विक्री करू शकता.

या व्यवसायामध्ये तुम्ही लागते दरवाजे फर्निचर खिडकी खेळणी असे वेगवेगळ्या वस्तू बनवू शकता. या प्रकारचे लाकडी वस्तूंची मोठ्या प्रमाणात मागणी असते. सोबतच तुम्ही व्यवसाय गावात करणार असल्यामुळे, तुम्ही शेतकऱ्यांसाठी बैलगाडी तसेच नांगर, जू असे लाकडी उत्पादने देखील बनवू शकता.

9 आंबा फळ उत्पादन

हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला इतर व्यवसाय पेक्षा अधिक कालावधी लागेल. कारण तुम्हाला स्वतः उत्पादन करायचं असल्यामुळे, सर्वप्रथम तुम्हाला आंब्याची झाडे लागवड करावी लागतील. त्यानंतरच तुम्ही आंबा फळ उत्पादन व्यवसाय सुरू करू शकता. परंतु हा व्यवसाय जास्त पैसे देणार आहे, जास्त प्रमाणात उन्हाळ्यामध्ये आंबा फळ येत असते त्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय हा उन्हाळ्या मध्येच करू शकता.

10 स्वच्छता सेवा

स्वच्छता सेवा मध्ये मुख्य रूपाने तुम्ही वेगवेगळ्या स्वच्छतेच्या प्रदान करू शकता. या व्यवसाया मध्ये तुम्ही लोकांना स्वच्छतेच्या सेवा देऊन पैसे मिळवू शकता. सद्यस्थितीला समाजाला अशा प्रकारची व्यवसायांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. कारण स्वच्छता हा समाजाचा गरजेचा विषय आहे. तुम्ही स्वतः स्वच्छता संबंधी व्यवसाय सुरू करून कंत्राटदार स्वरूपात वेगवेगळे काम करू शकता.

11 भाजीपाला व्यवसाय

भाजीपाला व्यवसाय हळदीची गावामध्ये सर्वाधिक चालणारा व्यवसाय आहे. तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्या शेतीमध्ये तुम्ही भाजीपाला लागवड करून त्याची विक्री करू शकता. याद्वारे तुम्ही पैसे कमवू शकता, भाजीपाला व्यवसाय हा रोजच्या स्वरूपातील व्यवसाय असून तुम्हाला व्यवसाय द्वारे रोज पैसे येतील. कारण लोकांना दररोज भाजीपाला आवश्यक असतो, तुम्ही जर लोकांना ताजा भाजीपाला पुरवला तर तुमचा व्यवसाय यशस्वी बनू शकतो.

12 संगणक इंटरनेट सेवा

डिजिटल युगामध्ये इंटरनेटचा वापर आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे, मुळे तुम्ही देखील गावांमध्ये व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर ही व्यवसाय कल्पना अभिनव आहे. संगणक आणि इंटरनेट सेवा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सद्यस्थितीला चालणारा व्यवसाय आहे. याद्वारे तुम्ही विद्यार्थ्यांना मुलांना संगणकाचे प्रशिक्षण देऊन तसेच इंटरनेटचा वापर कसा करायचा हे सांगू शकता, आणि यातून तुम्ही पैसे कमवू शकता.

13 डेअरी व्यवसाय

गावामध्ये व्यवसाय करण्यासाठी डेअरी व्यवसाय हा एक उत्तम आहे. दुग्ध व्यवसाय तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैसे मिळवून देऊ शकतो. गावातील जे लोक पशुपालन करतात त्यांच्याकडून तुम्ही दूध घेऊ शकता आणि तेच दूध तुम्ही विकू शकता. स्वतःची डेअरी तुम्ही जर चालू केली तर त्याद्वारे तुम्ही दुग्ध व्यवसाय करू शकता.

14 पोल्ट्री व्यवसाय

पोल्ट्री व्यवसाय हा देखील गावामध्ये केला जाणारा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. पोल्ट्री व्यवसाय मध्ये तुम्ही अंड्याची विक्री करून पैसे मिळवू शकता. यामध्ये तुम्हाला केवळ कोंबड्यांची खरेदी करणे आवश्यक आहे, तर त्यांच्यापासून तुम्ही अंडी मिळवून पोल्ट्री व्यवसाय करू शकता. अंडी विक्री बरोबरच, तुम्ही कोंबड्यांची विक्री देखील करू शकता. खवय्ये यासाठी कितीही रुपये मोजण्यासाठी तयार असतात. तुम्ही जर त्यांना चांगल्या प्रतीची कोंबडी उपलब्ध करून दिली तर तुमचा व्यवसाय हा यशस्वी बनू शकतो.

15 पिठाची गिरणी

गावामध्ये व्यवसाय करण्यासाठी तुम्ही पिठाच्या गिरणीचा व्यवसाय देखील करू शकता, गावात लोकांना पीठ दळण्यासाठी गिरणीवर जावे लागते. त्यामुळे तुम्ही स्वतः पिठाची गिरणी खरेदी करून लोकांना पीठ दळून देऊन पैसे कमवू शकता. पिठाच्या गिरण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकार असतात, त्यामध्ये मोठे गिरणी आणि छोट्या गिरणी असतात. सर्वप्रथम तुम्ही छोटी गिरणी घेऊन व्यवसाय सुरू करू शकता. त्यानंतर व्यवसाय जसा मोठा होत जाईल, तसं तुम्ही गिरणी देखील मोठी आणू शकता.

16 इलेक्ट्रॉनिक्स चे दुकान

व्यवसाय करण्यासाठी तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान देखील उघडू शकता, गावामध्ये शहराप्रमाणे मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक दुकाने उपलब्ध नसतात. त्यामुळे तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो, गावातील सर्व इलेक्ट्रॉनिक्सचे काम तुम्हाला मिळू शकते. यामध्ये तुम्ही कूलर फॅन सारख्या उपकरणांची दुरुस्ती करू शकता त्यांची विक्री करू शकता.

17 औषधी दुकान

गावामध्ये तुम्ही औषध दुकान सुरू करून व्यवसाय करू शकता. गावातील लोकांना गावातल्या गावात औषधी यामुळे मिळतील. सोबतच गावातील सर्व लोक तुमच्या दुकानावर औषधी खरेदी करतील, त्यामुळे तुमचा व्यवसाय देखील वाढेल. एक प्रकारे तुम्ही समाजाची मदत करून पैसे कमवू शकता.

18 कार बाईक सर्विसिंग

तुम्ही कार तसेच बाईक म्हणजेच मोटरसायकल यांची सर्विसिंग करण्याचा व्यवसाय सुरू करू शकता, शहराच्या मानाने गावामध्ये सर्विसिंग चे कोणतेही दुकान नसते त्यामुळे तुम्हाला याचा मोठा फायदा होईल. गावा मधील सर्व गाड्यांचे सर्विसचे कामे तुम्हाला येतील. सर्विसिंग व्यवसाय मध्ये तुम्ही गाडी कार मोटरसायकल यांच्याबरोबरच ट्रॅक्टर चार चाकी गाड्यांची देखील सर्विसिंग करू शकता. सर्विसिंग व्यवसाय मध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला पैसे मिळू शकतात.

19 ज्वेलरी मेकिंग वर्कशॉप

ज्वेलरी मेकिंग वर्कशॉप व्यवसाय तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैसे मिळवून देऊ शकतो. यामध्ये तुम्ही दागिने घडवून त्यांची विक्री करू शकता. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात सोने चांदी यांच्या दागिने खरेदी केले जातात. यामुळे तुमचा व्यवसाय नक्की यशस्वी होईल. ज्वेलरी मेकिंग वर्कशॉप मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ज्वेलरी दुकानातून ऑर्डर येऊ शकतात. तुम्ही ग्राहकांना थेट दागिने बनवून देऊ शकता किंवा दुकानांकडून ऑर्डर घेऊन दागिने बनवू शकता.

20 वन औषधी व्यवसाय

आयुर्वेदिक औषधी मध्ये येणारे वनौषधी तुम्ही व्यवसायिक स्वरूपात विक्री करून मोठ्या प्रमाणात पैसे मिळू शकतात. वनौषधी एक प्रकारे पारंपारिक औषधी असते त्यामुळे तुमच्या ग्राहकांना यामुळे मोठा फायदा होऊ शकतो. केमिकल युक्त औषधी ऐवजी आणि औषधी आयुर्वेदिक औषधी यांचा वापर हा आरोग्यासाठी चांगला असतो. त्यामुळे वन औषधी व्यवसाय मोठा फायदा देणार व्यवसाय आहे.

21 कामगार कंत्राटदार व्यवसाय

या व्यवसायांतर्गत तुम्ही लोकांना नोकरी देऊ शकता, नोकरी मिळवण्यासाठी त्यांची मदत करू शकता. कामगार कंत्राटदार व्यवसाय हा एक असा व्यवसाय आहे यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये या व्यवसायाद्वारे कामगारांना नोकरी दिली जाते. याद्वारे मोठ्या प्रमाणात बेरोजगार तरुणांना व्यक्तींना काम मिळते, मोठ्या प्रमाणात कंपन्या निर्माण होत असल्यामुळे आता या व्यवसायाचे स्वरूप वाढले आहे. त्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झाले आहेत.

22 कांदा साठवणूक व्यवसाय

या प्रकारच्या व्यवसायामध्ये तुम्हाला गोडाऊनची आवश्यकता भासणार आहे. यामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात कांदा साठवणूक करू शकता, आणि आवश्यकतेनुसार बाजारामध्ये त्याचा पुरवठा करून पैसे कमवू शकता. तसेच व्यापारी तत्वावर शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांचा कांदा साठवणूक करू शकता. हा व्यवसाय मोठा फायदा देणार आहे, त्यामुळे तुम्ही व्यवसायाद्वारे मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकता.

23 चहाचे दुकान

सर्वांच्या परिचयाचा हा व्यवसाय आहे, चहाचे दुकान सुरू करून तुम्ही भरमसाठ पैसे कमवू शकता. मोठ्या प्रमाणात लोक चहा चे शौकीन असल्यामुळे तुमचा चहाचा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. परंतु सध्या मोठ्या प्रमाणात चहाचे दुकान सुरू झाले आहेत, त्यामुळे तुम्हाला चहाचे दुकान जास्त करायचे असेल तर काहीतरी नावीन्यपूर्ण करणे गरजेचे आहे.

24 फुलांचा व्यवसाय

फुलांचा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात चालणारा व्यवसाय असून, वेगवेगळ्या सण उत्सवाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात तुम्ही पैसे कमवू शकता. तसेच वाढदिवसाला फुलांचा हार तसेच फुले यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते, त्याद्वारे तुम्ही पैसे मिळवू शकता. फुलांचा व्यवसाय हा काही कालावधीसाठीच करता येतो, परंतु तुम्ही वेगवेगळ्या फुलांच्या जाती वापरून हा व्यवसाय वर्षभर करू शकता.

25 छोटे सिनेमागृह

तुम्ही छोटे सिनेमागृह चित्रपटगृह सुरू करून देखील भरमसाठ पैसे कमवू शकता. ज्या भागांमध्ये चित्रपटगृह नाही अशा ठिकाणी तुम्ही छोटे सिनेमागृह म्हणजेच मिनी चित्रपटगृह सुरू करून पैसे मिळू शकता. मनोरंजन व्यवसायाशी निगडित असल्यामुळे तुम्हाला या व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसे मिळू शकतात. सिनेमागृहामध्ये तुम्ही वेगवेगळ्या चित्रपट लावून लोकांना आकर्षित करून तिकिटांद्वारे तसेच इतर माध्यमातून पैसे मिळू शकता.

तर मित्रांनो हे काही गावांमध्ये करता येणारे व्यवसाय आहेत, 25+ Village Business Ideas in Marathi मला आशा आहे तुम्हाला आम्ही दिलेली ही आहे ती आवडली असेल आणि महत्त्वाची वाटली असेल. अशाच माहितीसाठी आमच्या वेबसाईटला नक्की भेट देत राहा.


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *